अण्णा रिटर्न... इ दिल्ली

आता यापुढे उपोषण नाही करणार, आता होणार जेल भरो... अशी नवीन घोषणा करत सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर पुन्हा एल्गार पुकारलाय. 

Updated: Feb 23, 2015, 02:52 PM IST
अण्णा रिटर्न... इ दिल्ली  title=

नवी दिल्ली : आता यापुढे उपोषण नाही करणार, आता होणार जेल भरो... अशी नवीन घोषणा करत सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर पुन्हा एल्गार पुकारलाय. 

मला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायचे आहे, त्यामुळे आता उपोषण करून मी मरणार नाही. तर त्यांच्यासाठी जगायचं आहे. त्यामुळे आता जेल भरो होईल असे अण्णा यांनी यावेळी भाषण करताना सांगितले. 

सरकारनं भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करून विधेयकही मागे घेण्याची मागणी अण्णांनी केलीय. हे विधेयक शेतक-यांच्या विरोधात असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. 

दोन दिवसांचं आंदोलन पुकारणा-या अण्णांनी आपल्या आंदोलनाचा बाज बदललाय. यापुढं उपोषण नव्हे तर सरकारविरोधात जेलभरो करणार असल्याचा इशारा दिलाय. यावेळी अण्णांनी कुठे आहेत अच्छे दिन आहेत असा सवाल मोदी सरकारला केलाय. 

मायावतींचा अण्णांना पाठिंबा 
बसपा अध्यक्षा मायावती यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय.. तर जेडीयू नेते शरद यादव यांनीही देशभर आंदोलनाचा इशारा दिलाय.. ..........

राष्ट्रवादी-बसपचा भूमी अधिग्रहणाला विरोध
भूमी अधिग्रहण विधेयक हे शेतक-यांच्या हिताचंच असल्याचा दावा भाजपनं केलाय.. शेतकरी आणि उद्योजक या दोघांनाही फायदेशीर ठरेल असं हे विधेयक असल्याचं भाजपनं म्हटलंय.. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपानं भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध केलाय.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.