'भारताच्या मुली'चं भाजप नेत्याला प्रत्यूत्तर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 24, 2014, 02:01 PM IST
'भारताच्या मुली'चं भाजप नेत्याला प्रत्यूत्तर...  title=

मुंबई : आपल्याला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे नेते लक्ष्मण यांना सानिया मिर्झा हिनं सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय असेन’ असं सानियानं म्हटलंय.   

‘राजकीय व्यक्तींनी अशा व्यर्थ बडबडीमुळे मी खूप दुखावले गेलेय’ असं सानियानं म्हटलंय. ‘मला परकीय म्हणवणाऱ्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतेय’ अशा शब्दांत तिनं आपल्यावरच्या टीकेला उत्तर दिलंय.  

‘सानिया मिर्झा मुळची महाराष्ट्राची रहिवासी आहे. नंतर ती हैदराबादमध्ये स्थानांतरीत झाली होती. त्यामुळे, तीही परकीय आहे. लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, स्वतंत्र तेलंगना राज्याच्या मागणीला झालेल्या आंदोलनातही सानिया कधी दिसली नव्हती. सानिया मिर्झानं पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केल्यानं ती ‘पाकिस्तानची बहू’ आहे’ असं तेलंगनाचे भाजप नेते लक्ष्मणं यांनी म्हटलं होतं. सानियाची तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झालाय. 

‘मी भारतीय आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन... माझं कुटुंब हैदराबदला गेल्या शतकाहून अधिक काळापासून वास्तव्यास आहे...  भारतातील प्रमुख राजकारणी आणि मीडिया त्यांचा इतका मौल्यवान वेळ इतका शुल्लक गोष्टीसाठी वाया घालवतंय आणि यामुळेच मला जास्त वाईट वाटतंय’ असं सानियानं म्हटलंय.  

यानंतर पाहा सानियानं ट्विटर वर काय म्हटलंय...

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.