केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू

राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. 

Updated: May 3, 2016, 05:09 PM IST
केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू title=

रेवाडी : राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. 

'केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही मुंबईची हिरोईन नाहीत...' असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय. केजरीवाल यांना मिठी मारल्यासंदर्भात विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना लालूंनी हे विधान केलंय. 

'लालूंनी जबरदस्तीनं मारली मिठी'

लालू यांना पाटण्यात नीतीशकुमार यांच्या शपथ ग्रहण समारंभात केजरीवाल यांना मिठी मारली होती. यावर, टीका झाल्यानंतर केजरीवाल यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी, लालूंनी आपल्याला जबरदस्तीनं खेचून मिठी मारल्याचं म्हटलं होतं.