नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित ११ व्या सिव्हील सेवा दिवसाच्या कार्यक्रमात कामगारांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान सांगितलं की, त्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी आहे. पीएम मोदींनी सांगितलं की, बैठकीत अधिकारी सोशल साईट्स चेक करत असतात. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं.
मोदींनी म्हटलं की, नेहमी ते बैठकीत बघतात की, महत्त्वाच्या चर्चेमध्ये अधिकारी फोनवर सोशल मीडियावर असतात. आज जिल्हास्तरावरचे अधिकारी इतके व्यस्त असतात की त्यांचा अधिक वेळ हा सोशल मीडियावरच खर्च होतो. म्हणून मी मिटींगमध्ये मोबाईल फोन आणण्यास बंदी घातली आहे. कारण अधिकारी मिटींगमध्ये फोन काढून सुरु होऊन जातात.
पंतप्रधानांनी म्हटलं की, सोशल मीडियाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे स्वत:च्या प्रशंसेनसाठी नाही. जग ई-गवर्नेंस पासून मोबाईल-गवर्नेंसच्या दिशेने पुढे जात आहे. लोकांच्या हितासाठी सर्वश्रेष्ठ उपकरणांची आवश्यकता होती. सोशल मीडिया तेव्हा मदत करतो. जेव्हा त्याचा लोकांमध्ये वापर चांगल्या कामासाठी होतो.