www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कॉमनवेल्थपासून - टू जी पर्यंत अनेक घोटाळे उघड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले देशाचे ‘कॉम्पट्रोलर अॅन्ड ऑडीटर जनरल’ म्हणजेच कॅग (महालेखापरिक्षक) विनोद राय आज निवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांची वर्णी लागलीय.
आपल्या कारकिर्दीत तब्बल १२० अहवाल सादर करणाऱ्या राय यांची जागा संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांची निवड झालीय. शर्मा यांची स्वच्छ प्रतिमा त्यांच्या निवडीला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलंय. ते गुरूवारी पदभार स्वीकारतील.
पदभार स्वीकारल्यानंतर शशिकांत शर्मा यांच्यासमोर काय काय आव्हानं असतील... ते पाहुयात...
विनोद राय यांच्या निवृत्तीनंतर `कॅग`चा दरारा कायम ठेवण्याची जबाबदारी शर्मा यांच्यावर आहे. कॅगच्या ‘स्वच्छ प्रतिमा’ या लौकिकाला डाग लागणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी लागेल. पूर्वीच्याच सजगतेनं देशाचं ऑडीट होईल, हे शर्मा यांना पाहावं लागणार आहे. तसंच आपल्या शांत आणि संयमी स्वभावाचा कोणाला गैरफायदा घेऊ न देण्याचंही आव्हान शर्मा यांच्यासमोर असेल.
भारताच्या आत्तापर्यंतचे महालेखापरिक्षक आणि त्यांचा कार्यकाळ
> व्ही. नरहरि राव – १९४८ ते १९५४
> ए. के. चंद – १९५४ ते १९६०
> ए. के. राय – १९६० ते १९६६
> एस. रंगनाथन – १९६६ ते १९७२
> ए. बक्षी – १९७२ ते १९७८
> ज्ञान प्रकाश – १९७८ ते १९८४
> त्रिलोकी नाथ चतुर्वेदी – १९८४ ते १९९०
> सी. एस. सोमया – १९९० ते १९९६
> व्ही. के. शुंगलू – १९९६ ते २००२
> व्ही. एन. कौल – २००२ ते २००८
> विनोद राय २००८ ते २०१३
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.