...हे आहे 'एडस्'चं गाव!

उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.  

Updated: Jul 1, 2015, 07:59 PM IST
...हे आहे 'एडस्'चं गाव! title=

फतेहपूर : उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.  

इथल्या लोकांचा असा समज आहे की गावात जो माणुस मुंबईतुन येईल तो आपल्यासोबत मृत्यू घेऊन येईल. या गावातील जवळपास ४०० लोक मुंबईत काम करतात. मागच्या वर्षी एचआयव्हीमुळे गावातील ५२ लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे आतापर्यंत काही कुटुंब पूर्णपणे संपली आहेत. नुकत्याच या गावात दोन नवीन केस मिळाल्या आहेत. प्रशासन या साऱ्या प्रकारामुळे चकित आहेत. घरोघरी फिरणाऱ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांनी ४० लोकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्याचं सांगितलंय. 

या गावातील एका व्यक्तीचा १० वर्षांपूर्वी मुंबईत मृत्यू झाला होता... त्याच्या पत्नीलाही याच आजारानं ग्रासलंय... पण, आपली मुलं मात्र या आजारापासून दूर असल्याचं ती सांगते. 

याच गावात मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली असून तो अजूनही सेक्स वर्करच्या संपर्कात आहे. कानपूरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची बायकोही औषधं घेत आहे. या जोडप्याला दोन लहान मुलंही आहेत.

मागील १० वर्षांत गावातील बरीच कुटुंब या आजाराने उद्धस्त झाली आहेत. ५ कुटुंब संपूर्णपणे संपली आहेत. गावाजवळ कोणतेही हॉस्पिटल नसल्यामुळे बरेच जण तपासणी आणि चाचणीपासूनही दूर आहेत. शिवाय, समाजाच्या भीतीपोटी आरोग्य तपासणीला आलेल्या अधिकाऱ्यांनाही गावातील लोक रक्त तपासू देत नाही.

त्याचमुळे, आज या गावातील जवळपास प्रत्येक घरात हा रोग दाखल झालेला दिसतोय. याच रोगाचा फैलाव आसपासच्या गावातील तरुणांमध्येही होत आहे.  त्यामुळे वेळीच आरोग्यविषयक जागृती होणं आवश्यक आहे. बदनामी आणि भेदभावाच्या कारणामुळे हा आजार वाढत आहे. सध्या या जिल्ह्यात जवळपास २५० सेक्स वर्कर आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.