व्हिडिओ : दूधातून मलाई नाही प्लास्टिक निघालं

तुम्ही घरी आणलेलं दूध... तेही प्रसिद्ध ब्रॅन्डचं... तापवायला ठेवलं... आणि त्यातून सायीऐवजी प्लास्टिक निघू लागलं तर... 

Updated: Nov 4, 2016, 06:23 PM IST
व्हिडिओ : दूधातून मलाई नाही प्लास्टिक निघालं title=

नवी दिल्ली : तुम्ही घरी आणलेलं दूध... तेही प्रसिद्ध ब्रॅन्डचं... तापवायला ठेवलं... आणि त्यातून सायीऐवजी प्लास्टिक निघू लागलं तर... 

असंच एक प्रकरण आता समोर येतंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसातोय. हरियाणातल्या यमुनानगरची ही घटना असल्याचं सांगितलं जातंय.

यमुनानगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबानं 'अमूल' या कंपनीविरुद्ध ही तक्रार केलीय. एखाद्या प्लास्टिक बॅगचा हा अनुभव नव्हता... तर या कुटुंबानं खरेदी केलेल्या चार चार पिशव्यांमध्ये प्लास्टिक आढळलं.