बलात्काराला छोटी घटना म्हणणं निंदनीय, जेटलींवर काँग्रेसची टीका

 काँग्रेसनंही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना टीकेचं लक्ष्य केलंय. बलात्कारासारख्या घटनेला छोटी घटना म्हणणं आणि त्याला पर्यटनाशी जोडणं हे निंदनीय असल्याचं काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी म्हंटलय.तर महिला आयोगानंही जेटलींना धारेवर धरलंय.

Updated: Aug 22, 2014, 08:37 PM IST
बलात्काराला छोटी घटना म्हणणं निंदनीय, जेटलींवर काँग्रेसची टीका title=

नवी दिल्ली : काँग्रेसनंही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना टीकेचं लक्ष्य केलंय. बलात्कारासारख्या घटनेला छोटी घटना म्हणणं आणि त्याला पर्यटनाशी जोडणं हे निंदनीय असल्याचं काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी म्हंटलय.तर महिला आयोगानंही जेटलींना धारेवर धरलंय.

अरुण जेटलींच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतायत. पण निर्भयाचे वडीलही जेटलींच्या या विधानामुळं प्रचंड नाराज झालेत. अर्थमंत्र्यांना पर्यटनाचं उत्पन्न घटल्याचं दुःख वाटतंय, पण आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती गेली, त्याचं काय? हे देशाचं नुकसान नाही का? असा बोचरा सवाल निर्भयाच्या वडिलांनी केलाय. दरम्यान, अरुण जेटलींनी या वादविवादाबाबत खुलासा केलाय... आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा जेटलींनी केलाय. जेटलींनी काय सारवासारव केली.

दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय.गुरुवारी देशातील पर्यटन मंत्र्यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना अर्थमंत्र्यांनी, ‘दिल्लीमधल्या निर्भाया बलात्काराच्या एका छोट्या घटनेला जगभरात दाखवलं गेलं आणि यामुळेच पर्यटनामध्ये आपल्याला अरबो डॉलर्सचं नुकसान झालंय’ असं वक्तव्य केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.