'बीएसएनएल'चा धमाका, २ ऑक्टोबरपासून २ Mbps स्पीड

बीएसएनएल आपल्या ब्रॉडबॅण्ड सेवेतून २ एमबीपीएस स्पीड देणार आहे, येत्या २ ऑक्टोबरपासून बीएसएनएल ही सुविधा देणार आहे. बीएसएनएलचा स्पीड चार पटीने वाढणार आहे. 

Updated: Sep 7, 2015, 10:11 PM IST
'बीएसएनएल'चा धमाका, २ ऑक्टोबरपासून २ Mbps स्पीड title=

मुंबई : बीएसएनएल आपल्या ब्रॉडबॅण्ड सेवेतून २ एमबीपीएस स्पीड देणार आहे, येत्या २ ऑक्टोबरपासून बीएसएनएल ही सुविधा देणार आहे. बीएसएनएलचा स्पीड चार पटीने वाढणार आहे. 

बीएसएनएलला खासगी मोबाईल कंपन्यांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतोय. बीएसएनएल पुन्हा एका नव्या दमाने या कंपन्यांच्या स्पर्धेचा सामना करणार आहे. बीएसएनएलचा कमीत कमी ब्रॉण्डबॅण्डचा स्पिड ५१२ केबीपीएस असणार आहे.

हा स्पीड व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील पुरेसा असणार आहे.

बीएसएनएल आता २९९ रूपयात महिनाभर अनलिमिटेड ब्रॉडबॅण्ड प्लान देणार आहे, १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना २९९ रूपयात १ जीबी २ एमबीपीएस स्पीड मिळणार आहे. ही बीएसएनएलचा २ एमबीपीएस स्पीड खासगी कंपन्यांना मोठी स्पर्धा देणार आहे.
 
खासगी मोबाईल कंपन्या देखील येणाऱ्या काही दिवसात ब्रॉडबॅण्ड स्पीडमध्ये वाढ करू शकतात. सध्या टेलिकॉम कंपन्य़ांना ट्रायच्या नियमानुसार ५१२ केबीपीएस स्पीड देणे आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.