पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध

नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

Updated: Jan 12, 2016, 08:27 PM IST
पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध title=

व़ॉशिग्टन : नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

पाकिस्तान ह्या विमानांचा वापर कशा पद्धतीने करेल, अशी शंका असल्याने अमेरिकी काँग्रेसच्या काही सदस्यांनी यासंदर्भात ओबामा प्रशासनाला विनंती केली होती. यात डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांतील सदस्यांचा समावेश आहे.

 
अमेरिकी काँग्रेसचे वरचे सभागृह असलेल्या 'सिनेट'ने ओबामांना यासंदर्भात 'स्थगिती'ची सूचना पाठवली आहे. तरीही, ओबामांनी दबाव टाकल्यास हा करार पुढे जाऊ शकतो. 

पठाणकोट हल्ल्याचा तपास वेगाने केला जावा अशी सूचना अमेरिकेने पाकिस्तानला केली आहे, या पार्श्वभूमीवर ही घटना महत्वाची मानायला हवी. पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्याचा तपास नीट न केल्यास अमेरिकेसोबतच्या त्यांच्या पुढील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.