नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारीचे दर्शन घेणार आहेत. हे ऐकल्यावर तुम्हांला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे शक्य होणार आहे, येत्या २६ जानेवारी रोजी....
तुम्ही म्हणाल कसं... तर ऐक कसं... बराक ओबामा हे प्रत्यक्ष वारीच्या सोहळ्यात सामील होणार नाहीत. पण येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना निमंत्रित केले आहेत. या सोहळ्याला हजर राहण्यास ओबामांनी होकार दिला आहे. या सोहळ्यात विविध राज्यांचे चित्र रथ सामील होणार आहेत.
यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ हा शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या वारीवर आधारीत आहे. या चित्ररथाच्या रुपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना वारीचे दर्शन होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.