नवी दिल्ली : पीएफच्या पैशांसाठी आता तुम्हाला कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायची गरज नाही, कारण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पीएफच्या पैशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पीएफच्या क्लेमचा वेग वाढणार असून त्याचा लाभ ५ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. ऑनलाईन अर्जामुळे तीन दिवसात पीएफचे पैसे मिळणे शक्य होणार आहे.
सध्या पीएफचे पैसे काढून घेण्यासाठी कोणतीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. सर्वकाही कागदोपत्री काम प्रत्यक्षात कार्यालयात जाऊनच करावे लागते.
हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन सुविधा देण्यात येणार आहे. पैसे मिळण्याची प्रक्रिया सुपरफास्ट होणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्येच पैसे मिळवणे शक्य होईल. सध्याच्या पद्धतीनुसार पीएफचे पैसे हातात येण्यासाठी १५ ते ३० दिवसाचा कालावधी लागतो.
ही सुविधा सुरु केल्यानंतर पुढील ४ महिन्यात आर्थिक वर्ष संपण्याआधी पीएफच्या एकूण अर्जांपैकी २० ते ३० टक्के अर्ज ऑनलाइनवरुन क्लियर करण्याचे ईपीएफओचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये ईपीएफओने एकूण एक कोटी २१ लाख अर्जदारांना पैशांचे वाटप केले, ज्यामध्ये १० लाखाहून अधिक प्रकरणं पीएफ ट्रान्सफर्सची होती.
यंदाच्या वर्षी ईपीएफओने ४ कोटीहून अधिक युनिव्हर्सल पीएफ खाते क्रमांकांचे वाटप केले. ज्यांना आधार कार्ड आणि बॅंक खात्यांशी जोडले जात आहे. यामुळे खातेदारांना आयुष्यभरासाठी एकच पीएफ क्रमांक वापरता येणार आहे. त्यामुळे आता कंपनी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेगळे पीएफ खाते सुरु करण्याची गरज राहिलेली ना
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.