अलाहबाद : भारत सरकार राबवत असलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'संदर्भात उत्तर प्रदेश सरकार खरंच किती गंभीर आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'नमामि गंगे' या स्वच्छता अभियानाला एक मोठा धक्का बसला आहे.
नुकतेच उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च पदावरील एका अधिकाऱ्यालाच गंगा नदीत मूत्र विसर्जन करताना पकडले गेले आहे. गंगा नदीच्या 'त्रिवेणी संगम' या ठिकाणी हा अधिकारी खुलेआम मूत्रविसर्जन करत होता. अलाहबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ओ. पी. श्रीवास्तव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हायरल झाला.
यातील सर्वात मोठा उपहास म्हणजे हे कृत्य करताना या अधिकाऱ्याने 'स्वच्छ गंगा' अभियानाचा टी-शर्ट घातला होता.
उत्तर प्रदेश सरकार आयोजन करत असलेल्या 'त्रिवेणी महोत्सवाच्या' आयोजनाची तयारी करण्यासाठी हा अधिकारी येथे आला होता. उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत वाजपेयी यांनी या अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे.
Uttar Pradesh: Allahabad ADM OB Shrivastav caught on camera urinating at 'Triveni Sangam' pic.twitter.com/N8WoidCoho
— ANI (@ANI_news) February 23, 2016