उत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे!

 उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं. 

Updated: Nov 12, 2014, 05:46 PM IST
उत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे! title=

शाहजहांपूर, उत्तर प्रदेश:  उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं. 

दारूच्या नशेत असलेल्या शैलेंद्र शुक्ल या पोलीस शिपायानं त्या बारबालावर पैसेही उडवले. ते ही ड्यूटीवर असतांना... त्याच्या या धक्कादायक कृत्यामुळं त्यावर कारवाई करत निलंबित करण्यात आलंय. अशा एखाद्या पोलिसाच्या कृत्यामुळं संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतं, असं शाहजहांपूरचे एसपी म्हणालेत. 

पाहा हा व्हिडिओ-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.