नवी दिल्ली : सरकारी पेट्रोलियम कंपनीने जून महिन्यानंतर सलग सातवेळा पेट्रोल आणि तिनवेळी डिझेल दरात कपात करण्यात करण्याची योजना आखली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याने त्याचा लाभ उठवण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपनीने दर कपात करण्याचे धोरण अबलंबिले आहे.
उद्योग जानकारांच्या मते सध्याच्या बाजारातील उलाढालीमुळे इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्या या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्य दरात १ रुपया प्रती लिटर कपात होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.