मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

Updated: Jun 23, 2014, 08:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.
एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर संसदीय प्रकरणात मंत्रिमंडळ समितीची सोमवारी पहिली बैठक होईल. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षते खालील समितीनं बजेट अधिवेशनाची तारीख आणि त्यात संसदेची विषयपत्रिका तयार केली आहे.
समितीचे अन्य सदस्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कार्य मंत्री व्यंकय्या नायडू हे या बैठकीस हजर होते.
यूपीए सरकारच्या काळातील संसदेनं मंजूर केलेल्या लेखानुदानाची मुदत 31 जुलैला संपतेय. त्यामुळं नवीन सरकारचं नवं बजेट येत्या 10 जुलैला सादर केलं जाणार आहे. तसंच लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठीही निवडणूक बजेट अधिवेशन दरम्यानच होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.