उद्धव ठाकरे यांच्या विमानाला गोव्यात बंदी

गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन दिवसांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, त्यांच्या विमानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला.

Updated: Oct 14, 2016, 10:40 PM IST
उद्धव ठाकरे यांच्या विमानाला गोव्यात बंदी title=

पणजी : गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन दिवसांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, त्यांच्या विमानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला.

संघाचे नेत सुभाष वेलिंकर यांची शिस्तीच्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनीच संघापुढेच आव्हान निर्माण केले आणि स्वत:चा गोवा सुरक्षा मंच पक्ष स्थापन केला. खासदार संजय राऊत यांनी वेलिंकर यांची भेट घेऊन युतीचा समझोता केला. त्यामुळे गोव्यात भाजप विरोधात शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांना खासगी चार्टर विमान आणण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला असून आता येत्या २२ रोजी ते गोव्यात येतील, अशी माहिती शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी दिली.
 
२२ आणि २३ ऑक्टोबर असे दोन दिवस उध्दव गोव्यात असतील, असे सांगण्यात आले. या भेटीत ते ठरल्याप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाशी जागावांटपाबाबत चर्चा करतील. तसेच पर्वरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यातही मार्गदर्शन करतील. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करतील.