रायपूर : २००० रुपयांची नोट छापण्यासाठी जवळपास ३९ रुपये खर्च येतो. पण छत्तीसगडमध्ये मात्र २००० ची नोट १० रुपयामध्ये मिळत आहे.
छ्त्तीसगडमध्ये ५०० आणि २००० च्या लहान मुलांच्या खेळणातल्या नोटांना बाजारात पूर आला आहे. या नोटा नव्या २००० आणि ५०० च्या नव्या नोटांसारख्याच दिसत आहे. या नोटा नव्या नोटांच्या आकाराच्याच आणि समान रंगाच्याच आहेत. रात्रीच्या वेळेत तर या नोटांना ओळखणं देखील अवघड होऊन जाईल. १० रुपयामध्ये अशा नोटा मिळत असल्याने सध्या त्या चर्चेच्या विषय बनल्या आहेत.