केंद्र सरकारच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसचा मोर्चा

तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारच्या निषेधार्थ बुधवारी दिल्लीत धडक मोर्चा काढला. पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने निषेध केलाय.

Updated: Jan 4, 2017, 06:08 PM IST
केंद्र सरकारच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसचा मोर्चा title=

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारच्या निषेधार्थ बुधवारी दिल्लीत धडक मोर्चा काढला. पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने निषेध केलाय.

 चिट फंड घोटाळ्यात अटक झालेले सुदीप बंडोपाध्याय हे तृणमुलचे दुसरे खासदार आहेत. तपस पाल यांनाही CBIनं गेल्या शुक्रवारी अटक केली होती. अभिनेता ते नेते असा प्रवास केलेल्या बंडोपाध्याय यांना भुवनेश्वरमधून CBIनं ताब्यात घेतलं. या अटकेमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तिळपापड झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सुडाचं राजकारण करत असल्याची ओरड त्यांनी केलीये. तृणमूलच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत बुधवारी मोर्चा काढून आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली.