यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 4, 2017, 06:01 PM IST
यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश title=

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमेठीत एकाच परिवारातील 10 लोकांची हत्या करण्यात आली आहे, यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. यात 2 महिलांसह 8 मुलांचा समावेश आहे. हत्या करणाऱ्यानेही फाशी घेऊन आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

एकाच परिवारातील 11 लोकांचे मृतदेह पाहून महोना गावात शोककळा पसरलीय कुटुंब प्रमुख जमालुद्दीनचं प्रेत लटकलेलं होतं. पोलिसांनी घटनेमागील कारणं तपासणे सुरू केलं आहे.

नशेचे पदार्थ देऊन कुटूंब प्रमुखाने ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे, जलालुद्दीनची पत्नी आणि मुलींना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.