१०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा रेल्वेवर अंदाधुंद गोळीबार

बिहारमध्ये पाटणा-धनबाद इंटरसिटी एक्सप्रेसवर नक्षलवाद्यांनी हल्ला आणखी एक क्रूर हल्ला केलाय. या हल्ल्यात रेल्वेच्या रेल्वे मोटरमनला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. अजूनही हा गोळीबार सुरूच असल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 13, 2013, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बिहार
बिहारमध्ये पाटणा-धनबाद इंटरसिटी एक्सप्रेसवर नक्षलवाद्यांनी हल्ला आणखी एक क्रूर हल्ला केलाय. बिहारमधल्या जमूई इथं १५० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी ट्रेन हायजॅक करून ट्रेनवर चहुबाजुंनी अचानक गोळीबार केला. जमुई स्टेशनमास्तरांनी ट्रेनला हायजॅक करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
या हल्ल्यात रेल्वेच्या रेल्वे मोटरमनला गोळी लागून तो गंभीर जखमी झालाय. या हल्ल्याचं वृत्त समजताच सीआरपीएफचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. नक्षलवाद्यांनी आरपीएफ जवानांकडून हत्यारं बळकावण्याचाही प्रयत्न केला.
सीआरपीएफ जवान आणि नकक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. फायरिंग दरम्यान नक्षलवादी ‘लाल सलाम’च्या घोषणा देत आहेत.
प्रवाशांना रेल्वेमधून ट्रकवर उतरवण्यात आलंय. प्रवासी अजूनही भेदरलेल्या स्थितीत आहेत, असं त्यांच्या नातेवाईकांकडून समजतंय. ट्रेनमध्ये जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त प्रवासी असल्याचं सांगण्यात येतंय.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.