लॉ परीक्षेत कॉपी करतांना केरळच्या डीआयजींना रंगेहाथ पकडलं

बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात यामुळं एकच खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविलंय.

IANS | Updated: May 5, 2015, 02:03 PM IST
लॉ परीक्षेत कॉपी करतांना केरळच्या डीआयजींना रंगेहाथ पकडलं title=

कोची: बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात यामुळं एकच खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविलंय.

त्रिस्सूर क्षेत्राचे महानिरीक्षक असलेले टी. जी. जोसे यांनी मात्र कॉपी करताना पकडल्याचा आरोप साफ फेटाळून लावत मंगळवारच्या पेपरला हजेरी लावणार असल्याचं स्पष्ट केलंय. कलामस्सेरी इथल्या सेंट पॉल महाविद्यालयात एलएलएमचा क्राईम-२ पेपर सुरू असताना जोसे हे कॉपीवरून उत्तर लिहीत असताना आढळून आलं.

त्यांना पकडणाऱ्या परीक्षा निरीक्षकाला आपण आयपीएस अधिकाऱ्याची कॉपी पकडली हे माहीत नव्हतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जोसे हे दोषी आढळल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं जाईल, असं महात्मा गांधी विद्यापीठाच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.