दिग्गज समालोचक टॉनी कोझिअर यांचं निधन

दिग्गज क्रिकेट समालोचक आणि वेस्ट इंडिज क्रिकेटविषयी लिहणारे पत्रकार टॉनी कोझिअर यांचं निधन झालं आहे.

Updated: May 11, 2016, 09:56 PM IST
दिग्गज समालोचक टॉनी कोझिअर यांचं निधन title=

मुंबई: दिग्गज क्रिकेट समालोचक आणि वेस्ट इंडिज क्रिकेटविषयी लिहणारे पत्रकार टॉनी कोझिअर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी बारबाडोसमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 

टॉनी कोझिअर यांना 3 मेला गळा आणि पायाला इनफेक्शन झाल्यामुळे हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. टॉनी कोझिअर यांनी 1965 साली ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी समालोचन करायला सुरुवात केली. 

यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी क्रिकेट समालोचनाबरोबरच क्रिकेटविषयीची पुस्तकंही लिहीली. 1978 मध्ये त्यांनी द वेस्ट इंडिज: 50 इयर्स ऑफ टेस्ट क्रिकेट हे नावाजलेलं पुस्तक लिहीलं. क्रिकेटमधल्या योगदानाबद्दल टॉनी कोझिअर यांना एमसीसीनं आजीवन सदस्यत्व दिलं. 

टॉनी कोझिअर यांनी 40 वर्षांमध्ये तब्बल 266 टेस्ट मॅच पाहिल्याचं विस्डन या क्रिकेट मासिकानं 2003 मधल्या आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हंटलं होतं.