टोलनाक्यावर ४० ऐवजी ४ लाखांचं कार्ड केलं स्वाईप

टोलनाक्यावर डेबिट कार्ड दिल्यानंतर ४० रुपयांऐवजी ४ लाख रुपयांचं कार्ड स्वाईप करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Mar 14, 2017, 07:28 PM IST
टोलनाक्यावर ४० ऐवजी ४ लाखांचं कार्ड केलं स्वाईप title=

म्हैसूर : टोलनाक्यावर डेबिट कार्ड दिल्यानंतर ४० रुपयांऐवजी ४ लाख रुपयांचं कार्ड स्वाईप करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोची-मुंबई महामार्गावर गुंदमी टोलनाक्यावर डॉक्टर राव यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राव यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

यानंतर राव पोलिसांना टोलनाक्यावर घेऊन आले. हा प्रकार नजरचुकीनं झाला असल्याचं टोलकर्मचाऱ्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यानं वरिष्ठांची बोलल्यावर राव यांना त्यांची उरलेली ३,९९,९६० रुपये परत दिले.