'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी

नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. 

Updated: Sep 6, 2015, 04:09 PM IST
'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी title=

नवी दिल्ली: नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. 

त्याशिवाय वन रँक वन पेन्शन अंतर्गत अवयव निकामी झाल्यास किंवा इतर कुठल्याही कारणानं अर्ध्यावरच लष्करातून बाहेर पडावं लागलं, तरीही OROPचा लाभ मिळेलं असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलंय. स्वेच्छा निवृत्तीबद्दल अफवा परसल्या जात असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय. 

पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या सहाव्या लाईनचं उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतल्या मेट्रोच्या सहाव्या लाईनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी स्वतः या नव्या मेट्रोनं तासभर प्रवास केला. जनपथ ते फरिदाबाद अशा एक तासाच्या प्रवासात पंतप्रधानांनी सुरक्षा रक्षकांच्या कवचाला बाजूला सारून जनतेशी संवाद साधला. 

मेट्रोमधून प्रवास करताना पंतप्रधानांनी स्वतः काही प्रवाशांना जवळ बोलावून गप्पा मारल्या. बहुतांश प्रवासी मोदींच्या बाजूला बसून सेल्फी काढताना दिसले. फरिदाबाद मेट्रोसाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. साडे तीन वर्षात या मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागरीक विकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना मोदींनी गेल्या सरकारांनी अर्धवट टाकलेली कामं आम्ही पूर्ण करू शिवाय फरिदाबादची मेट्रो वल्लभगडपर्यंत नेण्याचाही निर्धार केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.