गाझियाबाद : काही हजार रुपयांचे कर्ज चुकवण्यासाठी एका तरुणाने आपल्या पत्नीला मित्राच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडलीये.
नरेश नावाच्या तरुणाने प्रॉपर्टी डीलर पिंटूकडून पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते त्याला फेडता न आल्याने त्याला बायकोचा सौदा करावा लागला.
इंडिया टुडेमधील बातमीनुसार, 29 सप्टेंबरला नरेशने कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचे सांगत आपल्या बायकोला त्याच्याकडे सोपवले.
दरम्यान, याप्रकरणी पिडीत महिलेने तिचा पती आणि प्रॉपर्टी डीलरविरोधातही तक्रार दाखल केलीये. तसेच प्रॉपर्टी डीलरने बलात्कार केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला. या प्रकरणातील दोनही आरोपींना अटक करण्यात आलीये.