आता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...

आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 6, 2015, 12:02 PM IST
आता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...  title=

नवी दिल्ली : आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. 

रेल्वेनं सर्वच श्रेणींच्या बुकींग कॅन्सलेशन करण्यावर मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यास तिकीटाच्या दुप्पट पैसे तुम्हाला दंड म्हणून भरावे लागू शकतात. 

तसंच तिकीट कॅन्सल करण्याच्या वेळेमध्येही बदल करण्यात आलेत. नव्या नियमांनुसार, ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेआधी 48 तासांपूर्वी तिकिट रद्द केलं तर प्रत्येक यात्रेकरूनला फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 240 रुपये, सेकंड एसी आणि फर्स्ट क्लासमध्ये 200 रुपये, थर्ड एसीमध्ये 180 रुपये, स्लीपरमध्ये 120 रुपये आणि सेकंड क्लासमध्ये 60 रुपये दंड भरावा लागणार आहे. 

इतकंच नाही तर, रिझर्व्ह तिकिटांवर लागणाऱ्या क्लर्क चार्जही वाढवण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करतंय. क्लर्क चार्ज आता सेकंड क्लासमध्ये 40 आणि स्लीपर - एसी क्लासमध्ये 60 रुपये दंड भरावा लागू शकतो. 

ट्रेन निघण्यापूर्वी चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. तसंच आरएसी आणि वेटिंग लिस्टच्या तिकीटांवर केवळ क्लर्क चार्ज कमी होईल. सोबतच ही तिकटं ट्रेन निघण्याच्या वेळेनंतर केवळ 30 मिनिटांपर्यंत रद्द करता येऊ शकेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.