नवी दिल्ली: भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
मागील आठवड्यात भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी मणिपूर इथं हल्ला केला होता. यात १८ जवान शहीद झाले होते. यानंतर आर्मीनं खूप गुप्तपणे ही योजना बनवली आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.
पाहा हे संपूर्ण ऑपरेशन 'गर्व' -
ऑपरेशन गर्वमध्ये पॅरा फोर्सच्या तीसहून अधिक जवान आणि एलएच ध्रुव हेलिकॉप्टर होते. विशेष म्हणजे या ऑपरेशनला केंद्र सरकारनं मंजुरी दिली म्हणून हे शक्य झाल्याचं सूत्रांकडून कळतंय.
भारतीय जवानांच्या या यशामागे सर्वात मोठा हात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा आहे. म्यानमारमध्ये घुसून ५० अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या २१ भारतीय जवानांचे फोटो लष्करानं जारी केलेत... भारतीय लष्कराच्या स्पेशल टास्क फोर्सचे हे जांबाज सैनिक आहेत... विशेष म्हणजे एकही सैनिक न गमावता हे ऑपरेशन यशस्वी केलं गेलं... तब्बल २१ किलोमीटर अंतर केवळ ३ तासांत पायी पार करून या जवानांनी अतिरेक्याचे ३ तळ अवघ्या अडीच-तीन मिनिटांत उध्वस्त केले... भारतीय लष्करानं पहिल्यांदाच केलेल्या या क्रॉस बॉर्डर ऑपरेशनमध्ये या जवानांनी दाखवलेल्या तडफेचं देशभरात कौतूक होतंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.