मुंबई : नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे खर्चासाठी पैसे काढण्यासाठी ATMमध्ये पुन्हा रांगा लागण्याची शक्यता आहे.
खात्यातील रक्कम काढण्यासाठी नोकरदार आणि निवृत्त कर्मचा-यांना पुढचे दोन आठवडे कष्टाचे जाणार असल्याचे संकेत आहेत. कारण प्रत्येक बँकेला नव्या छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत.
सर्वाधिक वेतनखाती ज्या बँकांमध्ये आहेत अशा बँकांना प्राधान्यानं नोटा देण्याचं धोरण रिझर्व्ह बँकेनं आखल्यानं इतर बँकांच्या ग्राहकांची परवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारदारांनी शक्यतो प्लास्टीक मनीचाच वापर करावा तसेच आपल्या खात्यातून गरजेपूरतेच पैसे काढावे हेच योग्य ठरेल.