मुंबई : आरबीआयने रेपो रेट दरात अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची घोषणा मंगळवारी केली. रेपो रेट मागील चार वर्षात सर्वात कमी, ६.७५ टक्के इतका कमी झाला आहे. रेपो रेट कमी झाल्याने गृह आणि इतर कर्जांवरील व्याजदरातही बँकांना मोठी कपात करावी लागणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठीच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात झाल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी रघुराम राजन यांचा अंदाज काही औरच होता, रघुराम राजन म्हणाले...
१) माझं नाव रघुराम राजन आहे, मी तेच करतो, जे मला करायचं असतं.
२) रेपो रेटमध्ये कपात केल्याविषयी राजन म्हणाले, "मला नाही वाटत आम्ही गरजेपेक्षा आक्रमक होतो, ही काही दिवाळी भेट नाहीय."
३) अर्थव्यवस्थेत अनेक समस्या आहेत, त्या वारसा म्हणून मिळाल्या आहेत, येथे काही चांदीच्या गोळ्या नाहीत.
४) बाजारात सुरू असलेले चढउतार, आपल्या बाजारातील सर्वात चांगल्या नीतींमुळे आपला बचाव करतात.
५) आरबीआय आणि सरकार अर्थव्यवस्था बदलण्यासाठी मेहनत घेत आहेत, लवकरच व्याज दरातील बदल बँका शेवटपर्यंत पोहोचवतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.