आधी करोडपती असलेले माजी गृहमंत्री रस्त्यावर!

छत्तीसगढचे माजी गृहमंत्री... अनेक वर्ष रमन सिंह सरकारमध्ये त्यांनी सांभाळलं मंत्रीपद... २०१३मध्ये निवडणूक हरले... सरकारी बंगला रिकामा केला नाही. आता जेव्हा सरकारनं त्यांना बिल पाठवलंय तर म्हणाले माझ्याजवळ दोन हजार रुपये सुद्धा नाहीयेत. एवढं बिल चुकतं करण्यासाठी मला माझी शेतीही विकावी लागेल. 

Updated: Sep 23, 2014, 09:31 AM IST
आधी करोडपती असलेले माजी गृहमंत्री रस्त्यावर! title=

रायपूर: छत्तीसगढचे माजी गृहमंत्री... अनेक वर्ष रमन सिंह सरकारमध्ये त्यांनी सांभाळलं मंत्रीपद... २०१३मध्ये निवडणूक हरले... सरकारी बंगला रिकामा केला नाही. आता जेव्हा सरकारनं त्यांना बिल पाठवलंय तर म्हणाले माझ्याजवळ दोन हजार रुपये सुद्धा नाहीयेत. एवढं बिल चुकतं करण्यासाठी मला माझी शेतीही विकावी लागेल. 

ननकीराम कंवर छत्तीसगढचे माझी गृहमंत्री, काही दिवसांपूर्वी सरकारनं त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासंबंधी नोटीस पाठवलीय. या नोटीशीत म्हटलंय, बंगला रिकामा करावा आणि बिलाचे दोन लाख चाळीस हजार रुपये भरावे. या नोटीसचं उत्तर देत माजी गृहमंत्र्यानं म्हटलंय, “माझ्याजवळ दोन हजार रुपये सुद्धा नाहीयेत तर मी दोन लाख चाळीस हजार रुपये कसे देऊ शकतो. इतका पैसा आणण्यासाठी मला माझी जमीन विकावी लागेल.”

एवढंच नव्हे तर त्यांनी मुख्यमंत्री रमन सिंह यांना ही रक्कम माफ करण्यासंबंधी पत्रही लिहिलंय. 

किती आहे ननकीराम कंवर यांची प्रॉपर्टी?

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करतांना माजी गृहमंत्री ननकीराम कंवर यांनी संपत्तीबाबत काय माहिती दिली होती वाचा... त्यावेळी ननकीराम कंवर यांच्याजवळ एकूण १ कोटी ८९ लाख ११,८४८ रुपयांची संपत्ती होती. त्यापूर्वी २००८मध्ये त्यांनी १ कोटी ३६ लाख ६७,००० रुपयांची घोषणा केली होती. म्हणजे पाच वर्षात जवळपास ४५ लाख रुपये त्यांची कमाई झाली. याकाळात त्यांच्या बँक खात्यात तीन लाख रुपये कॅश आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात अडीच लाख रुपये कॅश जमा होते. या निवडणूक घोषणेनंतर अवघ्या एका वर्षात त्यांच्याजवळ दोन हजार रुपये पण नाहीत, यावर कसा विश्वास ठेवायचा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.