दादरीमधील घटना ही पूर्वनियोजित : अल्पसंख्याक आयोग

उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस बाळगल्याचा संशय आल्यानं अखलाख नावाच्या व्यक्ती मारहाण करून हत्या करण्याचा प्रकार पूर्वनियोजित होता, असा निश्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं काढलाय. 

Updated: Oct 22, 2015, 12:33 PM IST
दादरीमधील घटना ही पूर्वनियोजित : अल्पसंख्याक आयोग title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस बाळगल्याचा संशय आल्यानं अखलाख नावाच्या व्यक्ती मारहाण करून हत्या करण्याचा प्रकार पूर्वनियोजित होता, असा निश्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं काढलाय. 

दादरीत पीडित कुटुंबाची भेट घेतल्यावर आय़ोगाच्या एका समितीनं यासंदर्भात अहवाल तयार केलाय. यात अखलाखला मारण्याचा कट हा गावतल्या मंदिरातच रचल्याचा दावा करण्यात आलाय. या समितीनं पीडित कुटुंबियांसोबतच काही गावकऱ्यांशी चर्चा केलीय.

यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात सर्वपक्षीय नेत्यांना प्रक्षोभक विधानं टाळण्याचं आवाहनही करण्यात आलंय. शिवाय सोशल मीडियावर धार्मिक तेढ पसरवणाऱ्या संदेशांबद्दलही कठोर कारवाई करण्याचा सल्ला सरकारला देण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.