खबरदार, गोव्यात दारू पिण्यावर बंदी

गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 24, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com, पणजी
गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
गोवा पर्यटन महामंडळ अधिनियमाअंतर्गत बीचवर दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन ठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही बंदी करण्यात आली आहे. गोव्यातील महिलांना होणारा उपद्रव आणि गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग असल्याने राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Goa Tourist Places (Protection and Maintenance) Act या कायद्याअंतर्गत पर्यटन स्थळांच्या शांततेचे जतन केले जाणार आहे. जो या नियमांचे उल्लघन करेल त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती गोवा पर्यटन विभागाचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.
दरम्यान, याआधी राज्य सरकारने गोव्यात येणाऱ्या वाहनांवर कर लागू केलाय. हा कर १०० रूपयांपासून १००० रूपयांपर्यंत आहे. राज्य सरकारने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी उपाय योजले असताना गुन्हा रोखण्यासाठीही आता कडक पाऊल उचलेही उचलली आहेत.