.www.24taas.com,मुंबई
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषध घेतली.
बिहारच्या सचिवांच्या पत्रावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा नीतिशकुमार यांची जोरदार समाचार घेतलाय. राज ठाकरेंचं डोकं फिरलंय. त्यांचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची टीका नीतिशकुमार यांनी केलीय. बिहारच्या सचिवांनी पाठवलेलं पत्र योग्यच असल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्र सरकावरही टीका केली. राज्य सरकारचा राज यांना छुपा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.
विनोद तावडेंही घसरले
राज ठाकरे संधीच्याच शोधत असतात. बिहारच्या मुख्य सचिवांच्या विधानावर राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया त्याचंच उदाहरण असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी म्हटलंय. बिहारच्या मुख्य सचिवांनी केलेल्या विधानाला राज्य सरकारने उत्तर द्यायला हवं होतं, असं म्हणत तावडेंनी या विषयावर अधिक राजकीय भाष्य न करण्याची सावध भूमिका घेतली.
दिग्विजय हे काँग्रेसचं बुजगावणं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारी नेत्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईतले आरोपी युपी आणि बिहारमध्येच का जातात असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसचं बुजगावणं असून काँग्रेसनं त्यांना केवळ शिवीगाळ करण्यासाठी ठेवल्याचा घणाघात राज यांनी केला. तसंच हिंदी चॅनेल्स मला हेतुपुरस्सर टार्गेट करतात, असं सांगत त्यांनी माझ्यावरील टीकेचा खेळ थांबवला नाही तर मीच त्यांचा महाराष्ट्रातला खेळ थांबवेल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
मी काय चुकीचं बोललो?
पाकिस्तानी कलाकारांना केलेल्या विरोधावरुन राज यांनी आशाताईंना रोखठोक सवाल केलाय. आशाताईंबाबत मी काय चुकीचं बोललो असा सवाल राज यांनी केलाय. आशाताईंना राजाकारण कळत नसलं तरी देशात काय चाललय हे तरी कळतं ना असंही राज ठाकरे म्हणाले. आशाताईंनी किमान देशभक्तीचा बाणा दाखवणं गरजेचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले.