जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट

मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

Updated: Dec 8, 2014, 07:59 PM IST
जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट title=

भोपाळ: मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

महाराष्ट्र, गुजरातसह देशभरातील अन्य प्रमुख शहरांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता असल्यानं देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशमधील तुरुंगातून पाच संशयित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. हे पाचही जण सिमी संघटनेशी संबंधीत होते. या पाच जणांनी बॅंकेमध्ये लुटमारी करुन दहशतवादी हल्ल्यासाठी पैसे जमवल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.

आयएसआयच्या इशाऱ्यावर हे हल्ले होतील अशी माहिती उघड झाली असून या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.