उधमपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, दोन पोलील जखमी

जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमाराची ही घटना आहे. जिल्ह्याच्या बसंतगड भागातल्या एका पोलीस चौकीवर त्यांनी हल्ला केला. यात दोन विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. 

Updated: Aug 7, 2015, 09:03 AM IST
उधमपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, दोन पोलील जखमी title=

जम्मू : जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमाराची ही घटना आहे. जिल्ह्याच्या बसंतगड भागातल्या एका पोलीस चौकीवर त्यांनी हल्ला केला. यात दोन विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. 

इथं सात दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. हल्ल्याची सूचना मिळाल्यानंतर सेना तसंच सुरक्षा दलांना घटनास्थळी रवाना करण्यात आलंय. घटनास्थळी उधमपूरहून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर बसंतगड संग पोलीस ठाणे आठ किलोमीटर दूर डोंगराळ भागावर आहे. 

यापूर्वी, याच उधमपूरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बुधवारी सुरक्षा दलावर हल्ला केला होता. यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय. उस्मान उर्फ नावेद या दहशतवाद्यानं उधमपूरच्या नारसूमध्ये नॅशनल हायवेवर बीएसएफच्या एका बसवर अंधाधुंद फायरिंगही केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.