राज ठाकरेंना लालूंच्या मुलाचं उत्तर

महाराष्ट्र ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

Updated: Mar 10, 2016, 07:52 PM IST
राज ठाकरेंना लालूंच्या मुलाचं उत्तर title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

‘मला राज ठाकरे यांना सांगावेसे वाटते,  महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. संपूर्ण देश हा देशातील प्रत्येकासाठी आहे', असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. 

परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले सत्तर हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीसाठी आणि त्यांच्या लाभासाठी देण्यात येत आहेत. हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात आले आहे, तसेच 70 टक्के परवाने हे परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत.

मराठी तरुणांवर हा अन्याय असल्याचे म्हणत नवीन रिक्षा दिसल्यास जाळून टाका, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.