पातेल्यात अडकली दीड वर्षांची चिमुकली, पण...

तामिळनाडूच्या तिरूवनंतपुरममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. खेळता खेळता एका दीड वर्षाची मुलगी पातेल्यात अडकली होती. अग्निशामन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन हायड्रॉलिक कटरच्या साह्याने पातेलं कापून मुलीला सुखरूप बाहेर काढले.

Updated: Apr 13, 2015, 12:40 PM IST
पातेल्यात अडकली दीड वर्षांची चिमुकली, पण... title=

तिरूवनंतपुरम : तामिळनाडूच्या तिरूवनंतपुरममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. खेळता खेळता एका दीड वर्षाची मुलगी पातेल्यात अडकली होती. अग्निशामन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन हायड्रॉलिक कटरच्या साह्याने पातेलं कापून मुलीला सुखरूप बाहेर काढले.

पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना रविवारी त्यावेळी झाली, जेव्हा मुलगी घरात खेळत होती. खेळता खेळता त्या डोकं सोडून मुलीचं पूर्ण शरीर पातेल्यात अडकलं होतं. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिला पातेल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य न झाल्याने त्यांनी पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला घटनेची माहिती देऊन मदत मागितली.

अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीला पातेल्यातून बाहेर काढले. त्यानंतर चिमुकलीला चेक-अपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, लगेचच तिला तेथून डिश्चार्जही देण्यात आला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.