दिल्ली : सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची पंडीत नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचं प्रकरण उघड झाल्यावर आता यावरून काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. ही कोणतीही गुप्तहेरी नाही असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय.
तर 'हा केवळ आरोप नाही... हेरगिरी झाल्याचा कागदोपत्री पुरावा आहे, मोदी सरकारने ही कागपत्र उघड करावीत' अशी मागणी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रा के बोस यांनी केलीय.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची हेरगिरी केली होती. गुप्त सूचीमधून हटवण्यात आलेल्या इंटेलिजन्स ब्युरोला दिलेल्या दोन फाईल्समधून नुकताच हा खुलासा झालाय.
१९४८ ते १९६८ दरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची हेरगिरी झाली होती. या २० वर्षांच्या काळात १६ वर्षांपर्यंत नेहरु देशाच्या पंतप्रधान पदावर होते आणि त्यांच्याच अखत्यारीत आयबी काम करत होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.