www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं आरुषी-हेमराज हत्याकांडात राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवलंय. या दोघांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश श्याम लाल यांनी ३ वाजून २५ मिनिटांनी या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला.
काय काय घडलं यावेळी कोर्टात, पाहुयात...
- आरुषी तलवार हिचे आई-वडील नुपूर आणि राजेश तलवार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी कोर्टात हजर होते.
- कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना आयपीसी कलम ३०२, ३४, २०१ नुसार दोषी करार दिलंय. तर राजेश तलवार यांना सेक्शन २०३ नुसारही दोषी ठरवण्यात आलंय.
- कोर्टात यावेळी १५-१६ जण उपस्थित होते.
- राजेश आणि नुपूर तलवार यांना अटक करण्यात आलीय. या दोघांनाही डासना जेलमध्ये पाठवलं गेलंय.
- सीबीआयची टीमही कोर्टात उपस्थित होती. सीबीआयच्या टीमकडून विरोधी पक्षाचं नेतृत्व करणारे आर.के. सैनी हेदेखील कोर्टात उपस्थित होते.
- अॅडव्होकेट तनवीर अहमद मीर हे तलवार दाम्पत्याच्या पक्षाकडून हे प्रकरण कोर्टात लढत होते. पण, त्यांना हार पत्करावी लागली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.