स्मृती ईराणी यांच्यावर शस्त्रक्रिया

Updated: Jul 10, 2015, 11:15 AM IST
स्मृती ईराणी यांच्यावर शस्त्रक्रिया title=

 

गुडगाव : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी दिल्लीजवळ गुडगावच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यात. इथं त्यांच्यावर थायरॉईडची शस्त्रक्रिया पार पडली.

दरम्यान, स्मृती इराणी यांची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिलीय. स्मृती ईराणी यांना सोमवारी मेडिसिटी मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं... त्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर वरिष्ठ तज्ज्ञ राजेश कुमार यांनी शस्त्रक्रिया केली.
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी गुडगावमध्ये जाऊन स्मृती ईराणी यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.