'हुंड्याच्या कायद्यात गरज पडली तरच अटक करा'

हुंडा प्रतिबंधक कायद्याचा अतिरेक नको, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावलाय. 

Updated: Jul 3, 2014, 03:54 PM IST
'हुंड्याच्या कायद्यात गरज पडली तरच अटक करा' title=

नवी दिल्ली : हुंडा प्रतिबंधक कायद्याचा अतिरेक नको, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावलाय. 

या प्रकरणी केवळ आरोपांच्या आधारावर अटक करु नये, सर्व प्रथम गुन्ह्याची नोंद करावी आणि गरज पडली तरच अटक करावी असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.  

हुंडा प्रतिबंधक कायदाविरोधी याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय.

हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.