तब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार...

खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून... 

Updated: Nov 11, 2016, 02:37 PM IST
तब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार... title=

  

मुंबई : खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून...
यंदाच्या वर्षात पाहायला आपल्याला तब्बल तीन वेळ सुपरमून पाहायला मिळणार आहे. यापैंकी दुसरा सुपरमून आपल्याला येत्या १४ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अधिक तेजस्वी चमकदार भव्य चंद्राचे दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. १४ नोव्हेंबरला चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ असणार आहे. त्यामुळेच ही अदभूत खगोलीय घटना म्हणजेच 'सुपरमून' तब्बल ६८ सालानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
 

'सुपरमून' म्हणजे काय?

- सुपर मून:जेव्हा पैर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो... तेव्हा तो भला मोठ्ठा दिसतो... चंद्राच्या या रुपाला सुपरमून म्हटलं जातं.
- जवळपास पृथ्वीच्या कक्षेत फिरताना चंद्र जेव्हा धरतीच्या जवळ येतो त्या स्थितीस 'पेरिजी' आणि जेव्हा तो दूर जातो त्या स्थितीस 'अपोजी' म्हणतात.
- सामान्यता: चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर प्रत्येक महिन्याला ३,५७,००० किमी ते ४,०६,००० किमी एवढे असते. याचे कारण त्याची अंडाकार कक्षा आहे.
- २०१६ मध्ये तीन सुपरमूनच्या घटना होणार आहेत. पहिला सुपरमून १६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहायला मिळाला होता. त्यादिवशी चंद्र पृथ्वीच्या ३,५७,८५७ इतका जवळ गेला होता. १४ नोव्हेंबरची हा दुसरा सुपरमून पाहण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे... यानंतर १४ डिसेंबर रोजी यंदाच्या वर्षातला शेवटचा सुपरमून पाहता येईल.