नवी दिल्ली : भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या टॅल्गो ट्रेनची आज अंतिम चाचणी होत आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी होत असून, या ट्रेनचा वेग ताशी 150 किमी असणार आहे.
पहाटे 2.45 वाजता ही ट्रेन दिल्लीवरुन निघालीय. ती मुंबईत दुपारी 2.29 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. टॅल्गो ट्रेनमुळे मुंबई - दिल्ली प्रवास फक्त 12 तासांमध्ये करणं शक्य होणारय. 2 ऑगस्टला टॅल्गोची पहिली चाचणी करण्यात आली होती.
मात्र, गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं तीला मुंबईत पोहोचायला अपेक्षित वेळेपेक्षा 2 तास उशीर झाला होता. टॅल्गो ट्रेनचा वेग 200 किमी प्रतितास आहे. मात्र भारतातील रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेनं कमी ठेवण्यात आला आहे.