सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा नोकर नारायण सिंह याची कसून चौकशी केली.

Updated: Jan 9, 2015, 07:25 PM IST
सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी  title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा नोकर नारायण सिंह याची कसून चौकशी केली.

या चौकशी दरम्यान दोन महत्त्वाच्याबाबी समोर आल्यात, पहिली म्हणजे सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूपूर्वी एक वर्षभर सुनंदा आणि शशी थरुर यांच्यात वाद वाढला होता. आणि सुनंदा यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीच सुनील साहब नावाचा इसम लीला हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांच्या बरोबर होते.

ही व्यक्ती नक्की कोण याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून या प्रकरणात शशी थरुर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावलीय.

दरम्यान,शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसंदर्भात शवविच्छेदन अहवालाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. २९ डिसेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या या अहवालात मृत्यूपूर्वी सुनंदा पुष्कर यांना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत्यूपूर्वी सुनंदा यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता अहवालात पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे. या अहवालानुसार तोंडावाटे किंवा इंजेक्शनने सुनंदा पुष्कर यांच्या शरीरात विषाचा शिरकाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.