अरविंद केजरीवाल नक्षलवादी, सुब्रमण्यम स्वामींचा घणाघात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. केजरीवाल नक्षलवादी असल्यामुळं त्यांना राज्य करण्यात रस नसल्याचं स्वामी म्हणालेत. 

Updated: May 19, 2015, 07:52 PM IST
अरविंद केजरीवाल नक्षलवादी, सुब्रमण्यम स्वामींचा घणाघात title=

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. केजरीवाल नक्षलवादी असल्यामुळं त्यांना राज्य करण्यात रस नसल्याचं स्वामी म्हणालेत. 

दिल्लीत मोफत वायफाय देण्यासारखं साधं आश्वासनही त्यांना पूर्ण करता आलेलं नाही. त्यामुळे ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत, असंही स्वामी यांचं म्हणणं आहे.

केजरीवाल यांनी कारण नसताना हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  

'निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करू शकत नाही, याची केजरीवाल यांन जाणीव झाली आहे. मुळात ते एक नक्षलवादी आहेत, त्यांना सरकार चालवण्यात रस नाही' असं ते म्हणाले. 

दरम्यान हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत पोचला असून आज केजरीवाल आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.