स्पाइसजेटचा दिवाळी धमाका, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास

कमी भाडं आकारणारी विमान कंपनी स्पाइसजेटनं आपल्या नेटवर्कच्या तीन लाखांहून अधिक सीट्ससाठी कमी पैशात प्रवासाची घोषणा केलीय. त्यामुळं आता घरगुती प्रवासाचं मूळ तिकीट अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मूळ भाडं ३,९९९ रुपये असेल.

Updated: Oct 27, 2015, 01:43 PM IST
स्पाइसजेटचा दिवाळी धमाका, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास title=

नवी दिल्ली: कमी भाडं आकारणारी विमान कंपनी स्पाइसजेटनं आपल्या नेटवर्कच्या तीन लाखांहून अधिक सीट्ससाठी कमी पैशात प्रवासाची घोषणा केलीय. त्यामुळं आता घरगुती प्रवासाचं मूळ तिकीट अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मूळ भाडं ३,९९९ रुपये असेल.

स्पाइसजेटनं आपल्या जाहिरातीत हा 'दिवाळी सेल धमाका' असल्याचं म्हटलंय. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून पुढील ९ महिने या योजनेअंतर्गत प्रवास करता येईल. त्यासाठी आजपासून २९ ऑक्टोबरपर्यंत आपण तिकीट बुकिंग करू शकता. या तिकीटवर १ फेब्रुवारी २०१६ ते २९ ऑक्टोबर २०१६पर्यंत प्रवास करता येईल.

स्पाइसजेटचे प्रवक्ता म्हणाले, 'आकर्षक भाडं आणि आमच्या वितृत नेटवर्कमुळे विविध स्थानांवरून प्रवाशांच्या आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळण्याची अपेक्षा आहे.' 

स्पाइसजेटनं सांगितलं की, प्रत्येक प्रकारच्या शुल्कासह एका बाजूचं भाडं सर्व मोठ्या शहरांसाठी आणि आकर्षक घरगुती पर्यटक स्थळांसाठी लागू असेल. या योजनेअंतर्गत दिल्ली-अमृतसर आणि अहमदाबाद-मुंबईचं मूळ भाडं ७४९ रुपये असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.