सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. 

Updated: Sep 29, 2016, 04:25 PM IST
सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या... title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. 

पाकिस्तानविरोधातील कारवाईच्या बाबतीत काँग्रेस मोदी सरकार सोबत असल्याचं सोनियांनी म्हटलं आहे.

देशाने असं पाऊल उचलल्यामुळे एक विशेष संदेश शेजारी राष्ट्राला जाणार असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. एकंदरीत सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सहमत दाखवलं आहे.

भारतीय लष्कराने पहाटेपासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आत जाऊन सात ठिकाणी, दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. यात ३० ते ३५ दहशतवादी मारले गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दोन पाकिस्तानी सैनिकांचाही यात मृत्यू झाला आहे.