नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनिकरण आजपासून होणार आहे.
एसबीआयमध्ये विलीन होणाऱ्या बँकांत स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा यांचा समावेश आहे.
विलीनिकरणात या सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाकडे हस्तांतरित होईल. या बँकांचे कर्मचारी आणि ग्राहकही एसबीआयकडे हस्तांतरित होतील.
स्टेट बँक ऑफ हैदराबादचा महाराष्ट्र आणि तेलंगणात मोठा पसारा आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर केरळातील प्रमुख बँक आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरचे राजस्थानात तर स्टेट बँक ऑफ पतियाळाचे पंजाबात मोठे जाळे आहे.
स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमध्ये १४ हजार कर्मचारी आहेत. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या २ हजार शाखा असून १८ हजार कर्मचारी आहेत.
काळजी नको!
या विलीनिकरणामुळे ग्राहकांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, बॅंकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ग्राहकाच्या खात्यात, पासबुक अथवा चेकबुकात कोणताही बदल होणार नाही.