नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढील आठव्यात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने या दोन्ही राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जवळपास निश्चित केल्यात. त्याची घोषणा पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधान सभेची मुदत ८ नोव्हेंबरला तर हरियाणा विधानसभेची मुदत 27 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.